मंगळवार, २६ मे, २०१५

राशीनुसार जाणून घ्या, तुमच्यासाठी बुधवार चांगला आहे की नाही

बुधवारी चंद्र अर्ध्या दिवसानंतर रास बदलत आहे. बुधवारी चंद्र सकाळी सिंह राशीत राहील. दुपारी जवळपास 3 वाजल्यानंतर कन्या राशीत प्रवेश करेल. सिंह राशीतील चंद्र तर शुभ फळ देतो परंतु कन्या राशीमध्ये चंद्र असल्यामुळे ग्रहण योग तयार होईल. चंद्र आणि राहू एकत्र आल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण होते. अचानक नुकसान होऊ शकते.


बुधवारी उत्तराफाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे प्रवर्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. हा योग दिवसभर राहील. सर्व राशींवर या योगाचा प्रभाव राहील. जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील....

मेष

दिवस अनुकूल असल्याने महत्त्वाची कामे उरकूनच टाका. मोठया लोकांच्या ओळखींतून आपला स्वार्थ साधून घ्याल. इतरांना दिलेले शब्द पाळता येतील. जोडीदाराच्या मर्जीत राहाल. आज घरगुती समस्या काढता पाय घेतील. शुभरंग : क्रिम, अंक-४.
  

वृषभ

कर्ज प्रकरणे कोर्ट प्रकरणे रेंगाळतील. प्रेमप्रकरणे फक्त मनस्तापच देतील. मोठे आर्थिक व्यवहार जपूनच करा. मोठेपणासाठी कुवतीबाहेर खर्च होईल. नवीन व्यावसायिकांनी संयम बाळगावा. तरुणांनी मर्यादेत राहावे. शुभरंग : लाल, अंक-४.

मिथुन

घरेलू जीवनात असमाधानी वातावरण राहील. नेहमीच्या रूटीनचा कंटाळा येईल. शेजारी सलोखा वाढेल. देण्याघेण्याचे व्यवहार चोख ठेवा. आईच्या प्रकृतीस जपा. साहित्यिकांच्या लिखाणास प्रसिद्धी मिळेल. घराबाहेर वाद होतील. शुभरंग : मोरपंखी, अंक- १.

कर्क

अनपेक्षितपणे काही येणी आल्याने आर्थिक व्यवहारातील अडचणी दूर होतील. अवघड समस्या आज सहजच सुटणार आहेत. बसल्या जागेवरून इतरांकडून आपली कामे करून घ्याल. सज्जनांचा सहवास लाभेल. शुभरंग : भगवा, अंक-५.
सिंह
प्रपंच परमार्थ दोन्ही आघाडयांवर प्रसन्नता अनुभवाल. तुमचीही समजूतदारपणे वागण्याची मानसिकता राहील. घरातील थोरामोठयाच्या मतांचाही आदर करणे हिताचे राहील. गृहिणींना विद्यार्थ्यांना आज अनुकूल दिवस. शुभरंग : सोनेरी, अंक-३.
कन्या
दैवाची अनुकूलता लाभेल. मुले आज तुमच्या मनासारखी वागतील. आज मातोश्रींकडून लाभ होतील. खर्च आज योग्य कारणांसाठीच हाेईल. गृहिणींनी तब्येतीवर जास्त ताण देऊ नये. गर्भवती महिलांनी काळजी ध्यावी.
शुभरंग : हिरवा, अंक-९.

तूळ

शानशौकसाठी खर्च होईल. व्यावसायिकांनी हितसंबंध जपावेत. निर्णय घेण्यात घाई नको. खर्च वाढला तरीही आवक पुरेशी राहील. जोडीदारास दिलेली वचने पाळाल. दैव अनुकूल राहील. लहरीपणास आवर घालावा लागेल. शुभरंग : नारिंगी, अंक-१.

वृश्चिक

आज भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य देऊन सर्व महत्त्वाची कामे वेळीच हातावेगळी कराल. नोकरदारांना वरिष्ठांचे उपदेश ऐकावे लागणार आहेत. घरातील थोरामोठयांचे सल्ले उपयुक्त ठरतील. मित्रमंडळींना आज लवकरच फुटवा. शुभरंग : राखाडी, अंक-७.

धनू

आज तुमचे मन काहीसे अस्वस्थ राहील. उगीचच एखाद्या गोष्टीचा त्रागा कराल. नोकरीच्या ठिकाणी असलेले नियम काटेकोरपणे पाळणे हिताचे राहील. गृहिणींना स्वत:साठी वेळ काढणे अशक्य होईल. विद्यार्थ्यांचा मूड लागेल. शुभरंग : पिवळा, अंक-३.

मकर

दुकानदारांची उधारी वसूल होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या विचाराने वागणे हिताचे. कोणत्याही स्पर्धा चढाओढीत यशाची खात्री बाळगा. रुग्णांनी डॉक्टरांच्या सूचना तंतोतंत पाळाव्यात, अन्यथा आजार वाढेल.
शुभरंग : केशरी, अंक-८.

कुंभ

वैवाहिक जीवनात सामंजस्य असेल. जोडीदारास कसलाही जाब विचारण्याची चूक आज तरी करु नका.संकुचित मनोवृत्तीस आवर घालून आजचा मनासारख्या घटनांचा दिवस सत्कारणी लावा. शब्द जपून वापरा. अनुकूल दिवस. शुभरंग : पांढरा, अंक-६.

मीन

यशासाठी अविश्रांत परिश्रम हवेत. आज सहज काही साध्य होण्याची अपेक्षा करु नका. महत्त्वाचे निर्णय आज नकोत. मुलांकडून चांगल्या बातम्या येतील. काही येणी असतील तर मात्र आज वसूल होण्याची शक्यता आहे. शुभरंग : निळा, अंक-१.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा