मेष


साप्ताहिक राशिभविष्य

७ ते १३ जून २०१५ 

ARROW LEFT AND RIGHT साठी प्रतिमा परिणाम

मेष 

  सावध राहा एकूण बाकीच्या ग्रहांनी जरी पाठ फिरवली असली तरी द्वितीयात रवी, मंगळ, बुध आणि चतुर्थात गुरू, शुक्र नि पूर्वार्धात चंद्राचे शुभ भ्रमण खूपच मदतीचे ठरेल. खोटी आपुलकी माणसाला जास्त काळ फसवू शकत नाही. हाच अनुभव आपल्याला येण्याची शक्यता आहे. अतिविश्वास, भावना, प्रेम यात रंगून न जाता समोरच्या व्यक्तीचे खरे स्वरूप समजून घ्या. प्रवाहात फार काळ वहात जाण्यापेक्षा शांत मनाने स्थिर राहून आपल्या मनाचे चित्र पाहा. असा अनुभव प्रेमातच नव्हे तर व्यवहारात, उद्योगधंद्यात नोकरीतही येईल तेव्हा सावध राहा. दिनांक : ८, ९, ११, १२ शुभकाळ महिलांना : वादविवाद नकोत, सावधपणे वागा, धीर धरा. प्रार्थनेत आनंद मिळेल.

ARROW LEFT AND RIGHT साठी प्रतिमा परिणाम

फुढे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा