वृषभ


साप्ताहिक राशिभविष्य 

७ ते १३ जून २०१५ 

ARROW LEFT AND RIGHT साठी प्रतिमा परिणाम
वृषभ
 यशस्वी व्हाल राशीस्थानी रवी, मंगळ, बुध. पराक्रमात गुरू, शुक्र. पंचमात राहू. एकूण ग्रहसौख्य उत्तम पण रवी, शनी प्रतियोगात गैरसमज चुकीचे अंदाज काहीशी फसवणूक अशा गोष्टींना सामोरे जावे लागेल. मात्र उद्योगधंद्यात, राजकारणात, नोकरीत आपण आखलेली रूपरेषा महत्त्वाची ठरेल. कुटुंबात संशय, मानापमानाचे वादळी ढग येतील व हळूहळू विरळ होतील व नंतर आकाश स्वच्छ मोकळे होईल. जास्त बोलणारी माणसे सहसा यशस्वी होत नाहीत, पण मोजकेच बोलणारी माणसे जास्त कर्तृत्ववान असतात, हे लक्षात असू द्या. दिनांक : ७, ८, ९, १०, ११ शुभकाळ महिलांना : विचाराने वागा, जपून बोला. समस्यांतूनच उपाय सुचतील.
ARROW LEFT AND RIGHT साठी प्रतिमा परिणाम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा